‘त्याच्या’ भितीने तिने धावत्या ट्रेनमधून मारली उडी; अखेर आरोपी अटकेत

‘त्याच्या’ भितीने तिने धावत्या ट्रेनमधून मारली उडी; अखेर आरोपी अटकेत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विनयभंगाच्या भीतीने विद्यार्थिनीने लोकलमधून उडी मारल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केलीय.

22 ऑक्टोबरला रविवारी पायल कांबळे या तरुणीने छेडछाडीच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती.

सीएसएमटी स्थानकावरुन करीरोडला जात असताना ही घटना घडली. रविवारी सकाळच्या लोकलने पायल कांबळे ट्युशनसाठी जात होती.

यावेळी एक तरुण महिलांच्या डब्यात चढला. यावेळी छेडछीच्या भीतीने पायलने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. यामध्ये तिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

रेल्वे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version