जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अवघ्या 500 रुपयांमध्ये उपनगरीय रेल्वेच्या सर्व मार्गासाठीचा समावेशक पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
या पासच्या आधारे प्रवाशाला महिनाभर मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्व मार्गावर कितीही वेळा फिरता येणार आहे.
द्वितीय श्रेणीसाठी 500 रुपये असलेले हे शुल्क प्रथम श्रेणीच्या मासिक पाससाठी 1500 रुपये आहे.
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव पाठवला. प्रस्ताव मान्य झाल्यास ही पास सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.