सिन्नरमध्ये उसाच्या शेतामध्ये बिबट्याची दोन नवजात बछडे आढळून आली. ऊसतोडणीचे काम थांबवत त्वरित घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली.या बछड्यांना त्यांच्या मातेकडे स्वाधीन करण्यासाठी वन विभागाच्या पथकाने नियोजन केले. मात्र मादी बिबट्याने केवळ एकच बछडे नेले. तर दुसऱ्या बछड्याला मात्र आईच्या कुशीत जाण्यासाठी अक्षरशः ३० तास प्रतीक्षा करावी लागली. दिवसभर वन विभागाने या बछड्याची सुरक्षित हाताळणी करत त्याची काळजी घेतली.अखेर ३० तासांनंतर दोन्ही बछडे मादी घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
उसाच्या शेतात काम करत असलेल्या उसतोड मजुरांनी बिबट्याचे बछडे पाहून मादी जवळपास असावी या भितीने शेताच्या बाहेर पळ काढला आणि या घटनेची माहिती आढाव यांना दिली. माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून दोन बछडे आढळून आल्याची वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने या दोन्ही बछड्यांना दूध पाजले व उसाच्या शेतात भाजीपाल्याच्या कॅरेट मध्ये ठेवले आणि ट्रॅप कॅमेरा लावला.
दरम्यान, बुधवारी सकाळी पुन्हा वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असता बछडा तिथेच असल्याने पथकाने या बछड्याला घेऊन नांदूरशिंगोटे येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. तेथे या बछड्याला दूध पाजले तसेच खायला दिले. सायंकाळी ५.३० वाजता पुन्हा घटनास्थळी जाऊन बछड्याला कॅरेटमध्ये ठेवले. त्यानंतर १५ मिनिटांनी मादी आली व दुसर्या बछड्याला घेऊन गेली. काही तासानंतर मादी आपल्या बछड्यांना घेऊन जाण्याकरिता आली आणि दुरावलेल्या बछड्यांना घेऊन जातानाचा व्हिडीओ या कॅमेरात कैद झालाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.