जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकच्या मालेगाव तालुक्याच्या साकुरमध्ये नरभक्षक बिबट्याने एका चिमूकल्याला लक्ष केले.
नरभक्षक बिबट्यानं कुणाल प्रकाश अहिरे या चिमुरड्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुणालचा दुर्दैवी अंत झालाय.
बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आता साकुर गावात मोठ्या संख्येने वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेत.
याशिवाय बिबट्याला ठार करण्यासाठी हैदराबादहून खास शार्पशूटर मागवण्यात आले आहेत. बिबट्याच्या या हल्ल्यानंतर संपूर्ण गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.