लेहमध्ये उभारणार सर्वात उंच लोहमार्ग

लेहमध्ये उभारणार सर्वात उंच लोहमार्ग

वृत्तसंस्था, नवी दिल्ली


काश्मीरच्या खोऱ्याला रेल्वेच्या नकाशावर आणल्यानंतर आता लेहलाही रेल्वेनं जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

बिलासपूर-मनाली-लेह असा 498 किलोमीटर लांब लोहमार्ग उभारण्यात येणार आहे.

 

हा मार्ग समुद्र सपाटीपासून 3 हजार 300 मीटर उंचीवर आहे. सध्या चीनमधला क्विंघाई तिबेट रेल्वेमार्ग जगातील सर्वात जास्त उंचीवरचा रेल्वेमार्ग ओळखला जातो.

 

मात्र, लेह इथला रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर तोच जगातला सर्वात उंचावर असलेला रेल्वेमार्ग ठरेल 27 जूनला या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात येणार

आहे. या सर्वेक्षणासाठी सुमारे 157 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version