भाजप प्रवेश करण्यासाठी आसुलेले माजी मंत्री लक्ष्ण ढोबळेंनी घेतले नितीन गडकरींचे आशीर्वाद

भाजप प्रवेश करण्यासाठी आसुलेले माजी मंत्री लक्ष्ण ढोबळेंनी घेतले नितीन गडकरींचे आशीर्वाद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेश करण्यासाठी आसुलेले माजी मंत्री लक्ष्ण ढोबळेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचे आशीर्वाद घेतलेत.

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी नितीन गडकरींची ढोबळेंनी भेट घेतली. ढोबळे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत.

मात्र, काही तांत्रिक कारणामुळे त्यांना प्रवेशापासून दूर रहावे लागत आहे.मंगळवारी ढोबळे यांनी गडकरी यांचे आशीर्वाद घेतल्याने आता पुन्हा एकदा ढोबळे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झालीय.

याशिवाय सेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनीसुद्धा विमानतळावर आपल्या परिवारातील नगरसेवकांसह मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version