घुंगरु तुटतायत…

घुंगरु तुटतायत…

जय महाराष्ट्र न्यूज, अकलूज

 

गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम असलेली लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे. पूर्वी मराठी सिनेमांतही या कलेला अतिशय मानाचं स्थान होतं.

लावणीकडे अभिजनवर्ग वळला, हे जरी खरे असलं तरी, गावोगावच्या जत्रांमधून, उत्सवांमधून लावणी पिढ्यान् पिढ्या जनसामान्यांचे रंजन करीत राहिली. पण आर्थिक पाठबळाअभावी या कलावंतिणींच्या पायातली घुंगरंच मूक होत चाललीयत.

अकलूजची लावणी स्पर्धाही त्याच वाटेवर आहे. येथल्या घुंगरांचा आवाज पंचवीस वर्षांनंतर आता थांबलाय. संयोजन समितीनंच हा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारने या स्पर्धेला राजाश्रय द्यावा, अशी मागणी संयोजकांची आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version