बिदरकरांनी पळवली लातूरची गाडी

बिदरकरांनी पळवली लातूरची गाडी

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

 

मुंबई-लातूर एक्सप्रेस बचाव कृती समितीच्या वतीने लातूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

 

मुंबई-लातूर एक्सप्रेस बीदरपर्यंत वाढविल्याने लातूर, उस्मानाबाद परिसरातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत़. या रेल्वेचा विस्तार बीदरपर्यंत झाल्यामुळे लातूर व उस्मानाबादच्या प्रवाशांना रेल्वेत पाय ठेवायलाही जागा मिळत नाही, असे असताना जनरल डब्बे कमी करण्यात आले आहेत़.

 

त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विस्तारीकरण रद्द करण्यात यावे व उदगीरच्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून स्वतंत्र रेल्वे सोडण्यात यावी, या मागणीसाठी लातूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे़.

 

या बंदला लातूर शहरातील हजारो नागरिकांनी सह्या देवून पाठिंबा दर्शविला आहे़. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीत पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे़. लातूर बंदनंतर 9 मे रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे़.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version