जय महाराष्ट्र न्यूज, लातुर
एकीकडे विकासाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या भारतात अजूनही अंधश्रध्दा जोपासली जात आहे. महाराष्ट्राच्या लातुर जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली.
लातुरच्या औसा तालुक्यातील काराला गावातल्या कुटूंबात जर कोणी मृत्यूमुखी पडलं. तर, या गावच्या स्वामींच्या सांगण्यावरुन त्या कुटूंबाला तीन ते सहा दिवस गृहत्याग करावा लागतो आणि पुन्हा घरात प्रवेश करायचा असेल तर 20 ते 25 हजार रुपये खर्च करून महाराजांच्या हस्ते शांती यज्ञ करावी लागते.
असे न केल्यास तुमच्यावर संकट येईल असे हा स्वामी सांगतो. याच गावातल्या कांही लोकांना ही प्रथा म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा प्रकार वाटते. त्यामुळे अशा भोंदू स्वामींवर कार्यवाहीची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली.
एकीकडे प्रगतीपथाकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही अंधश्रध्दा आणि भोंदूगिरीचे प्रकार घडताना दिसत आहे. ही फार चिंतेची बाब आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.