कर्मचाऱ्यानेच घातला पालिकेला गंडा, करापोटी वसूल केलेली रक्कम भरलीच नाही

कर्मचाऱ्यानेच घातला पालिकेला गंडा, करापोटी वसूल केलेली रक्कम भरलीच नाही

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

लातूर महानगरपालिकेतील कर्मचारीच महापालिकेला गंडा घालत आहे. एका कर्माचाऱ्यानं करापोटी वसूल केलेली रक्कम मनपा कार्यालयात भरलीच नाही. सर्व प्रकरण उघड़कीस आल्यानंतर कर्मचाऱ्यानं पलायन केले. कर्मचाऱ्यास निलंबित करण्याची कारवाई मनपा प्रशासनाने सुरू केलीय.

कर निरीक्षक रामदास धोत्रे यांनी मागील अनेक दिवसांपासून जमा केलेले करापोटीचे दहा लाख रुपये महापालिका कार्यलयात भरलेच नाहीत. याची माहिती आर्थिक वर्ष संपल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांना लक्षात आली. चौकशी केल्यानंतर त्यातील आर्थिक घोळ समोर आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version