जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या सायन कोळीवाडामध्ये पोलीसांनी लाठीचार्ज केला. या भागातील जिर्ण झालेल्या इमारतींचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवाठा खंडीत करण्यासाठी महानगरपालीकेचे अधिकारी आणि पोलीस गेले होते.
मात्र, येथे राहणाऱ्या लोकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने येथील नागरीकांनी विरोध केला. त्यावेळी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.