आज लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरु असून देशातील 8 राज्यात 59 मतदारसंघात मतदान होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि चंडीगड या राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघातही आज मतदान होत असून सगळ्यांचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे. तसेच या लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी होणार असून मतदारांच्या नेमकं मनात काय या दिवशी स्पष्ट होणार आहे.
शेवटच्या टप्प्यातील मतदानाचे लाईव्ह अपडेट्स –
11 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी –
बिहार – 17.94 टक्के
हिमाचल प्रदेश – 15.66 टक्के
मध्य प्रदेश – 16.28 टक्के
पंजाब – 15.65 टक्के
उत्तर प्रदेश – 14.43 टक्के
पश्चिम बंगाल – 21.11 टक्के
झारखंड – 23.86 टक्के
चंदीगड- 10.40 टक्के
शेवटच्या टप्प्यातील मतदानाची 9 वाजेपर्यंतची टक्केवारी –
क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी पंजाबमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही पटना येथील मतदान केंद्रावर केले मतदान.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथून मतदानाचा हक्क बजावला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.