Landslide in Ratnagiri: घाटात दरड कोसळली; वृद्ध ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती,बचावकार्य सुरू

दरड कोसळून एक वृद्ध व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे.
Landslide in Ratnagiri:  घाटात दरड कोसळली; वृद्ध ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती,बचावकार्य सुरू

 रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वाकेड घाटात सुरू असलेल्या पेट्रोल पंपाच्या बांधकामादरम्यान शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक दरड कोसळून एक वृद्ध व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे.

मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग अचानक खचला. त्यावेळी पावसापासून बचावासाठी कामाच्या ठिकाणी असलेल्या केबिनच्या आडोशाला एक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वृद्ध व्यक्ती थांबली होती. दरड कोसळताच ही व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

या दुर्घटनेवेळी घटनास्थळी काम करणारे जेद अतिकुल त्यागी (वय १८), सुवेल अयुब त्यागी (वय १९) आणि महंमद समीन साहवेज (वय २२) हे तिन्ही कामगार थोडक्यात बचावले. हे तिघेही बिहार राज्यातील रहिवासी असून दरड कोसळताच त्यांनी वेळीच सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वृद्धाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वृत्त लिहिपर्यंत बचावकार्य सुरू होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version