साखर कारखान्यात जमीन घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

साखर कारखान्यात जमीन घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बीड येथील मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याची पाहणी केली. जगमित्र साखर कारखान्यात जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत. जमीन घोटाळा संदर्भात बरदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप नेते किरीट सोमय्या आज अंबाजोगाईत दाखल झाले. तसेच जगमित्र साखर कारखान्यातील गैरव्यवहाराबाबत किरिट सोमय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन लिहून ईडीकडे तक्रार केली. दरम्यान कारखान्यासाठी जमीन घेत असताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. किरिट सोमय्या यांना दौऱ्यादरम्यान समाज माध्यमावरून धमक्या येत असून याबाबत त्यांनी पोलीस यंत्रणेला याबाबत माहिती दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version