चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी ठरले असल्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. डोरंडा ट्रेझरीमधून १३९ कोटी रुपये अवैध पद्धतीने काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. १९९६ साली झालेल्या चारा घोटाळ्याप्रकरणी २६ वर्षानंतर निकाल लागला असून याप्रकरणी १८ फेब्रुवारीला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.

चारा घोटाळा नेमकं प्रकरण काय?

प्राण्यांचा चारा, औषधं, पशूपालन उपकरणांचा घोटाळा.

९०० कोटींचा घोटाळा १९९६ साली आला होता उघडकीस.

बिहारचे तत्कालीन मंत्री लालू प्रसाद यादव हे मुख्य आरोपी.

२३ जून १९९७ मध्ये लालू प्रसाद यादवांसह ५५ जणांविरोधात आरोपपत्र.

२९ जुलै १९९७ रोजी लालू प्रसाद यादव यांना अटक.

१३ डिसेंबर १९९७ मध्ये यादव यांची तुरुंगातून सुटका.

२८ ऑक्टोबर १९९८ रोजी लालू प्रसाद यादव यांना पुन्हा अटक.

मार्च २०१२ मध्ये पाटणा कोर्टात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version