लालू म्हणाले मला जेलमध्ये खूप थंडी वाजते; न्यायाधीशांनी थंडी घालवण्यासाठी दिला अजब सल्ला

लालू म्हणाले मला जेलमध्ये खूप थंडी वाजते; न्यायाधीशांनी थंडी घालवण्यासाठी दिला अजब सल्ला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सुनावण्यात येणाऱ्या शिक्षेचा निकाल पुन्हा एकदा लांबला आहे. विशेष सीबीआय न्यायालय आता शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात येईल.

यापूर्वी दोनदा लालूंच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. तब्बल 21 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. विशेष न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच 69 वर्षीय लालूप्रसाद यांना अटक करण्यात आली होती.

यानंतर लालूंच्या शिक्षेची सुनावणी दोनदा टळली होती. त्यामुळे लालूंना आज काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र, आज पुन्हा एकदा लालूंची शिक्षा टळली. दरम्यान लालूंनी माझ्या प्रकृतीचा विचार करून कमीत कमी शिक्षा करावी, अशी विनंती न्यायाधीशांना केली आहे.

तुरुंगात खूप थंडी वाजते, असंही त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं. यावेळी न्यायाधीशांनी लालूंना तबला वाजवण्याचा सल्ला दिला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version