लालबागच्या राजासमोर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने सध्या तणावाचं वातावरण आहे.
दरम्यान नेमकं कशामुळे हा वाद निर्माण झाला हे अद्याप समोर आलेलं नाही आहे. दर्शनाच्या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असून याच ठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे. दोघेही अगदी हमरी-तुमरीवर आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
या अगोदरही लालबाग गणपतीच्या कार्यकर्त्यांकडून भाविकांना आणि पोलिसांना धक्काबुक्कीच्या घटना घडल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.