मुंबईत लाभार्थी शेतकरी? मुख्यमंत्र्यांनी काय दिलं स्पष्टीकरण?

मुंबईत लाभार्थी शेतकरी? मुख्यमंत्र्यांनी काय दिलं स्पष्टीकरण?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत मुंबईतील एकूण 813 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. असल्याचं वाचून-ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

 

मुंबईसारख्या औद्योगिक नगरीत एवढे शेतकरी आले कुठून? ते पूर्णवेळ शेतकरी आहेत की त्यांचे अन्यही व्यवसाय आहेत? त्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. या शंकेचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

 

दरम्यान, कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांची जी यादी आम्ही जाहीर केली आहे, ते प्रस्तावित लाभार्थी आहेत. ते सगळेच कर्जमाफीसाठी पात्र आहेत का, याची संपूर्ण चौकशी करूनच त्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा खुलासा फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version