नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला

नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला

नवी मुंबई, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नेरुळ सेक्टर सहा येथील तुलसी भवन या इमारतीच्या सी विंगचा स्लॅब कोसळलून मोठी दुर्घटना घडली. इमारतीच्या तीनही मजल्यांचे स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आले. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. जखमींवर नेरुळच्या डी वाय पाटील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून तुलसी भवन आणि आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे. इमारतीचा कोसळलेला ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version