घरात ढसाढसा रडली होती क्रिती

घरात ढसाढसा रडली होती क्रिती

मुंबई, १२ मे ३०२३, प्रतिनिधी : अभिनेत्री क्रिती सेनन ही सध्या तिच्या आगामी आदिपुरुष या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. दम्यान या साठी ती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावते. अशातच एका मुलाखतीत क्रितीने आपल्या मॉडेलिंगच्या काही आठवणींना उजाळा दिला. तिचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

एका मुलाखतीत क्रितीनं सांगितलं की, तिच्या पहिल्या फोटोशूट दरम्यान ती खूप उदास होती. आपल्या करिअरचे सुरुवातीचे दिवस आठवताना तिने आपल्या पहिल्या फोटोशूटचा एक किस्सा सांगितला. ती म्हणाली,” मी माझ्या पहिल्या फोटोशूट दरम्यान खूप उदास झालेले. पहिलीच वेळ असल्याने त्यावेळेस मी बऱ्याच चुका केल्या. या चुका माझ्या खूप जिव्हारी लागल्या आणि मग मी घरी येऊन खूप रडले. मी चुका केलेय हि गोष्ट मला टोचत होती.”
तिचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version