कोयता टोळी अटकेत

कोयता टोळी अटकेत

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहराला ‘कोयता गँग’ चे ग्रहण लागले आहे. मध्यवर्ती भाग असो किंवा उपनगर, टोळक्यांकडून अनेक वेळा कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सर्रास सुरू आहेत.

पुण्यातील प्रमुख भागात ही टोळी सक्रीय आहे. दरम्यान जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीत कोयते उगारुन दहशत केल्याची घटना घडली होती. ही दहशत माजविणाऱ्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळक्यांकडून चार कोयते आणि दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये रणजीत रघुनाथ रामगुडे, रोहन गोरख सरक, विशाल शंकर सिंह, आदित्य राजेश वडसकर या आरोपींना पोलिसांना बेड्या ठोकल्या.

या आरोपींनी जंगली महाराज रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने तपास करत या आरोपींना अखेर अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे. मागील काळात नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतरही पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version