जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
कोपर्डी खटल्याच्या सुनावणीत आरोपी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडेंचा अर्ज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला आहे.
खोपडेंनी बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या यादीत विशेष सरकार वकील उज्ज्वल निकमांसह सहा जणांची नावं दिली होती.
बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या यादीत विशेष सरकारी वकील निकम यांची साक्षही घ्यावी, अशी मागणी करणारा अर्ज वकील खोपडेंनी केला होता.
तो अर्ज नगर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. नगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या या आदेशावर आम्ही हायकोर्टात अर्ज करणार असल्याचं वकिलांनी सांगितले.
त्यावर कोर्टानं 24 जुलैपर्यंतची मुदत दिली असून 24 तारखेला याबाबत हायकोर्टात केलेल्या अपीलाची काय स्थिती आहे, हे म्हणणं मांडण्याची मुदत दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.