नराधमांना फाशी की जन्मठेप?

नराधमांना फाशी की जन्मठेप?

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यात शिक्षेवर आज युक्तीवाद होणार आहे. शनिवारी या प्रकरणात तिघांना दोषी ठरवण्यात आले होते. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही आरोपींना कोर्टानं दोषी सिद्ध केले आहे. यातील नितीन भैलूमे याचे वकील प्रकाश आहेर आज युक्तिवाद करणार आहेत. 11 वाजता युक्तिवाद सुरू होणार आहे.  

या खटल्यात वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले, असा निर्वाळा कोर्टानं दिला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात सरकारची बाजू मांडली. 13 जुलै 2016 रोजी नगरच्या कोपर्डी गावात नववीत शिकणाऱ्या मुलीवर तिन्ही दोषींनी बलात्कार केला, त्यानंतर अतिशय निर्घृण पद्धतीनं तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर त्या नराधमांना फाशी की जन्मठेप? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version