#निर्भयालान्याय – कोपर्डी बलात्कार प्रकरणातील तिन्ही नराधम दोषी

#निर्भयालान्याय – कोपर्डी बलात्कार प्रकरणातील तिन्ही नराधम दोषी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल आज लागला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नगरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जिल्हा सत्र न्यायालयात सकाळी या  निकालाला सुरुवात झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि तीन आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद पूर्ण झाल्याने आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

विषेश सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सलग तीन दिवस अंतिम युक्तीवाद केला. तीन दिवसांच्या युक्तीवादानंतर निकम यांनी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमेने कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचा युक्तीवाद केला. त्यावर आज जिल्हा सत्र न्यायालयात तिन्ही आरोपींवरील दोष सिध्द झाले आहेत. 21 नोव्हेंबरला या आरोपींवर शिक्षेची सुनावणी होणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version