पैशांपुढे हरली मैत्री; सात हजारांसाठी घेतला मित्राचा जीव

पैशांपुढे हरली मैत्री; सात हजारांसाठी घेतला मित्राचा जीव

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

कोल्हापुरात पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मोबाईलचे साडेसात हजार रूपये देण्यावरून मित्रानेच खून केल्याचे उघड झाले. दोघेही गांधीनगर येथील एका कपड्याच्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून काम करायचे. हे दोघे एकाच रूम मध्ये राहत होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अतुल अंबुरे यांने, संजय बेले यांच्याकडून साडेसात हजार रुपयांना मोबाईल विकत घेतला होता. मात्र, अतुल हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने, संजय बेले याने दत्ता दळवे आणि शिवाजी शिंदे या मित्रांच्या मदतीने अतुलचा खून केला. संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version