जिवंतपणीच महिलेने राहत्या घरात स्वतःची चिता रचली अन्…

जिवंतपणीच महिलेने राहत्या घरात स्वतःची चिता रचली अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोल्हापुरात एका वृद्धने स्वतःची चिता रचून जीवन यात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. कोल्हापुरातल्या बामणी गावात ही घटना  घडलीय.

कलव्वा कांबळे असे या मृत महिलेचे नाव आहे. स्वतःच्या राहत्या घरात चिता रचून या महिलेने जीवन संपवले. कलव्वा कांबळे ह्या अनेक वर्षांपासून एकट्याच राहत होत्या.

आपले काम आपणच करून स्वतःला लागेल तेवढे अन्न तयार करून खात होत्या. मात्र, सोमवारी रात्री त्यांनी स्वतः चिता रचली आणि अंगाभोवती साड्या गुंडाळून पेटवून घेतले.

हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. त्या नेहमीप्रमाणे घराबाहेर आल्या नाहीत म्हणून शेजारी राहणाऱ्या नागरिकांना चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version