जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात आश्वासन दिल्यानंतर अद्यापही पगारी पुजारी नेमण्यात आलेले नाही.
त्यामुळे मंत्रालयाच्या दारातच अंबाबाईचा गोंधळ घालणार असल्याचा इशारा पुजारी हटाव संघर्ष समितीने दिला आहे.
15 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास देवस्थान समितीच्या दारात आंदोलन केलं जाईल आणि त्यानंतर मंत्रालयासमोर देवीचा गोंधळ घातला जाईल.
असा इशारा संघर्ष समितीचे सदस्य दिलीप देसाई यांनी दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.