वाहतूक शाखेची बनावटगिरी उघडकीस; अवैध दंड वसूलीसाठी बनावट पावत्या

वाहतूक शाखेची बनावटगिरी उघडकीस; अवैध दंड वसूलीसाठी बनावट पावत्या

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापुरात दंडाच्या नावाखाली बनावट पावत्या बनवुन लुटणाऱ्या वाहतुक पोलिसांचा गोरखधंदा समोर आला आहे.

 

कोल्हापुरात वाहतूक पोलिसांच्या शाखेसमोरच ड्रेनेज लाईनमध्ये दंडांच्या पावत्या फेकल्याचं आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

 

नियमाप्रमाणे पावत्यांवर शासकिय मुद्रा असणं आवश्यक आहे. मात्र, दंडवसूलीच्या या पावत्यांवर मात्र, खाजगी क्रेन धारकांचं नाव आहे.

 

त्यामुळे दंडवसूलीच्या नावाखाली वाहनधारकांची फसवणुक केली जातं असल्याचं निदर्शनास आलंय. दरम्यान शहरात पार्कींगची कोणतीही सुविधा नसताना केवळ खिसे

भरण्यासाठी दंड गोळा केला जात असेल तर, या वसुलीला शिवसेना विरोध करेल असं शिवसेने सांगितले.

 

तर, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी करणार असल्याचं वाहतूक पोलीस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version