कोल्हापूर-बेळगाव महामार्गावर अपघात; 3 ठार,3जण जखमी

कोल्हापूर-बेळगाव महामार्गावर अपघात; 3 ठार,3जण जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

कोल्हापूर- बेळगाव महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय.  या अपघातात 3 जण जागीच ठार झालेत तर 3 जण जखमी झालेत. मंगळवारी पहाटे चार वाजता हा अपघात झाला आहे. जखमींवर कोल्हापूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पहाटे मुंबईला जाताना ही कार निपाणीजवळ आल्यानंतर चालकाचा ताबा सुटला आणि  कार रस्त्याच्या क़डेवर असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला असून पोलीस यंत्रणांनी कारचा पत्रा कापून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version