जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात भाविकांनी पुकारलेल्या पुजारी हटाव आंदोलनाला आज मोठं यश लाभलं.
विधानसभेत पुजारी हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत तीन महिन्यात याबाबत कायदा करण्याचे आश्वासन मंत्री रणजित पाटील यांनी दिल्यानंतर कोल्हापूरात पुजारी हटाव संघर्ष समितीने जल्लोष केला.
मंदिर परिसरात फटाके वाजवून आणि साखर पेढे वाटून अंबाबाईच्या गजरात समितीने आपला आंनद व्यक्त केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.