कोल्हापूरात सर्वपक्षीय नेत्यांच अर्धमुंडण आंदोलन

कोल्हापूरात सर्वपक्षीय नेत्यांच अर्धमुंडण आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये शिवाजी पुलाचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अर्धमुंडण आंदोलन सुरु करण्यात आले आहे. कोल्हापुरातून रत्नागिरीला जाणाऱ्या मार्गावर शिवाजी पूल आहे. या पुलाला 140 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे या पुलाला पर्यायी पुल उभारण्यात आला.

मात्र, त्या पुलाचं बांधकाम मध्येच बंद करण्यात आलयं. गेल्या साडेतीन वर्षांपासून या पुलाचं काम रखडलयं. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत अर्धवट राहिलेलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहणार असल्याचे आंदोलकांनी म्हटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version