लोचेपोटी घेतलेले पैसे त्या पोलिसाने गिळले

लोचेपोटी घेतलेले पैसे त्या पोलिसाने गिळले

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

पोलिसाने लाच घेतल्याची बातमी तर आपण नेहमीच ऐकतो, पण लाचेपोटी घेतलेले पैसे चक्क गिळून टाकल्याचा प्रकार कोल्हापुरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात घडला आहे. पंडित

पोवार असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

 

 

पासपोर्टसाठी आवश्यक असलेला चारित्र्य पडताळणी दाखला देण्यासाठी पंडित पोवार याने मेडिकल रिप्रेझेंटिव्ह असलेल्या एका तरुणाकडे 2000 रुपयांची लाच मागितली. त्यापैकी 1500

रुपये स्वीकारतांना लाचलुचपत विभागाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र याची कुणकुण लागताच पोवार याने पळ काढत 1500 रुपये गिळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

 

 त्यावेळी त्याला पकडून सोनोग्राफी द्वारे आणि पोटातील काही अंश घेऊन पुरावा गोळा करण्यात आला. कोल्हापूरात एकाच आठवड्यात दोन पोलिसांवर लाचलुचपत विभागाने कारवाई

केल्याने पोलिसांच्या प्रतिमा मलिन झाल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version