रुग्णालयात कुमारी मातांची बेकायदेशीर प्रसुती; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

रुग्णालयात कुमारी मातांची बेकायदेशीर प्रसुती; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

इचंलकरंजीच्या जवहारनगरातल्या हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. डॉ अरुण पाटील यांच्या या हॉस्पिटलमध्ये कुमारी मातांची बेकायदेशीर प्रसुती केली जात असल्याचं उघडकीस आलंय.

केंद्रीय पथकाने धाड टाकली त्यावेळी हा प्रकार उडकीस आला. ही मुलं मातांकडून विकत घेतली जात असल्याचंही समोर येतंय.

या हॉस्पिटलमध्ये मातांची प्रसुती झाल्यानंतर ही लहान मुलं  कुमारी मातांकडून विकत घेतली जात असत.

कुमारी मातांना या बालकांचे 2 लाख दिले जात असत आणि त्याची मुंबई आणि छत्तीसगडला जादा दरानं विक्री केली जात असे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version