जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्नाटकात गुन्हे दाखल झालेल्या मुंबई-बंगळुरू एसटी कर्मचाऱ्यांची केस महाराष्ट्र सरकार लढणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
जय महाराष्ट्र या घोषणेला बंदी घातल्यानंतर जय महाराष्ट्रचा लोगो असलेली मुंबई-बंगळुरू एसटी कर्नाटकात गेली.
त्यानंतर कर्नाटक सरकारनं या एसटीच्या चालक आणि वाहकावर गुन्हे दाखल केले आहेत.
चालक प्रमोद गायकवाड आणि वाहक देविदास मोरेटे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच या एसटीचं स्वागत करणाऱ्या मराठी भाषिकांवरही गुन्हे दाखल केले. या
सर्वांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.