खून-मारामाऱ्या करणाऱ्या हातांनी फुलवली शेती

खून-मारामाऱ्या करणाऱ्या हातांनी फुलवली शेती

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कारागृहातले कैदी म्हणजे फक्त भांडणं आणि मारामारी एवढंच विश्व असतं, असा आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज असतो.

मात्र, या सगळ्याला फाटा देत, कोल्हापुरच्या कळंबा कारागृहातील कैद्यांनी चक्क शेती फुलवलीय.

कळंबा कारागृहामध्ये 100 एकरांमध्ये शेती फुलवली जाते. यामध्ये कैद्यांसाठी लागणाऱ्या भाज्या, भात, ज्वारी, गहू सर्व काही कारागृहातच पिकवले जातं.

कैद्यांसाठी वापरून जर भाजीपाला राहिला तर त्याची सरकारी दराप्रमाणे विक्री केली जाते. अत्याधुनिक यंत्रांचे कैद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी लागणारी यंत्र सामुग्री कैदीच वापरतात. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version