जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
कोल्हापूरच्या विजयानं मुंबईचं दर्शन घेतलंय. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर विजया चौगुलेनं मुंबईची सफर केलीय. गृहपाठ केला नाही म्हणून विजयाला 500 उठबशांची शिक्षा करण्यात आली होती. 300 उठाबशा काढल्यानंतर ती कोसळली होती. तिला आधी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर तिला मुंबईतल्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आलं.
केईएममध्ये दोन दिवसांत तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. 25 दिवसांनंतर विजयाच्या पायांचं थरथरणं थांबलं. तिला आता व्यवस्थित चालता येऊ लागलंय… त्यामुळे विजयाचे कुटुंबिय खूश आहेत. मुंबई दर्शनानंतर विजया कोल्हापूरला आपल्या घरी परतणार आहे. शाळेत शिक्षकांकडून मिळालेल्या 500 उठाबशांच्या शिक्षेचा विजयाला शारिरिक तसेच, मानसिकही त्रास झाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.