देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असतानाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाली आहे. कोल्हापुरातली आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याकडे भर दिला जात आहे. पहिल्या लाटेत अनेकांना रुग्णालयात बेड मिळाले नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले होते. तर यंत्रणेमध्येही असलेल्या त्रुटींचा फटका अनेकांना बसला होता.
ही स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी आता सगळ्या यंत्रणा सज्ज झाल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे सीईओ अमल मित्तल यानी सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.