जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
किरकोळ कारणावरून कोल्हापूर शहरातील एका हॉटेलमध्ये तरुणांनी धिंगाणा घातलाय. एका शुल्लक कारणावरुन या तरुणांनी हॉटेल कामगारावर चाकू हल्ला केलाय.
हा सगळा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करून गुन्हा दाखल केलाय.
तर जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वेटरने विचारपूस केल्यानंतर एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून हा हल्ला झालाय.
तोडफोड करणाऱ्या एका तरुणाने किचनमध्ये जाऊन देखील एका वेटरला मारहाण केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.