कोल्हापूरची अंबाबाई मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया करूनही झीज

कोल्हापूरची अंबाबाई मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया करूनही झीज

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

अंबाबाईच्या मूर्तीची झीज होत असल्याचं समोर आलं. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली देवीची ही मूर्ती दोन हजार वर्षांपूर्वीची आहे. मूर्तीची झीज होऊ नये म्हणून 2015 मध्ये रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. या प्रक्रियेनंतर पुढच्या 100 वर्षांत मूर्तीला काहीही होणार नाही असा दावा करण्यात आला होता. पण आता या मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले आहेत.

 

देवीच्या मुर्तीच्या पायाचा भाग आणि गदेचं टोकंही झिजल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी केलेली संवर्धन प्रक्रियाच वादाच्या भोवऱ्यात सापडली. भक्तांची वाढती गर्दी आणि गाभाऱ्यातील तापमानामुळे मूर्तीची झीज होत असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता यावर काय निर्णय होणार याकडेच साऱ्या भाविकांचं लक्ष लागलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version