जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कोल्हापूरात अंबाबाई देवीच्या रथोत्सव सोहळा उत्सहात पार पडला. भाविकांसह या सोहळ्यात नेते मंडळींनीदेखील हजेरी लावली होती. भारताच्या माजी पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही उपस्थिती दर्शवली.
यावेळी त्यांनी सगळ्यांना सुख, समाधान, शांतता मिळावी यासाठी देवीकडे साकडं घातलं. पुरस्कार वितरणासाठी त्या कोल्हापूर दौऱ्यावर होत्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.