चोरट्यांनी एका रात्रीत फोडली 29 दुकाने

चोरट्यांनी एका रात्रीत फोडली 29 दुकाने

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

कोल्हापूर शहराजवळच्या गांधीनगर भागांमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. कोल्हापुरात तब्बल 29 दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री दोन ते तीन तासांच्या दरम्यान चोरट्यांनी 29 दुकानांची शटर उघडून धाडसी चोरी केली.

चोरट्यांचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. कोरेगाव-भीमा घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्र बंदमुळे पोलीस बंदोबस्त कोल्हापूर शहर आणि संवेदनशील भागांमध्येही लावण्यात आला होता.

पण, त्याचा फायदा या चोरट्यांनी घेतला. गांधीनगर हे कोल्हापूर जिल्ह्यातील कपड्याचे मोठे मार्केट म्हणून ओळखले जाते आणि याच मार्केटमधल्या तब्बल 29 दुकानांमध्ये चोरी केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version