जय महाराष्ट्र वेब न्यूज, कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या 19 नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाने चागलाच दणका दिला आहे. निर्धारित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे.
या घटनेमुळे कोल्हापूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे या प्रभागात फेरनिवडणूक होणार आहे.
आरक्षित जागेवर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीनंतर 6 महिन्यांत जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते, पण कोल्हापुरातील 19 नगरसेवकांनी निर्धारित वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे पद रद्द करण्यात येणार आहेत. या निर्णयानंतर आता या प्रभागात फेरनिवडणूक होणार आहे.
नगरसेवकपद रद्द झालेले नगरसेवक
काँग्रेस 8
ताराराणी 4
राष्ट्रवादी काँग्रेस 4
भाजप 3
शिवसेना 1
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा परिणाम राज्यातील 27 महापालिकांसह, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवरही होणार आहे.
या नगरसेवकांचे पद रद्द
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.