बँकेतून पैसे काढून नागरीक बाहेर आले की तो त्यांच्यावर झडप घालायचा अन्…

बँकेतून पैसे काढून नागरीक बाहेर आले की तो त्यांच्यावर झडप घालायचा अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

बँकेतून पैसे काढून बाहेर येणाऱ्या नागरिकांच्या बॅग पळवणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी कल्याणच्या एक्सीस बँकेबाहेर सापळा रचून चोरट्याला अटक केली. अरुन देड्डा असं आरोपीचं नाव असुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

 

देड्डा याला अटक करताच त्याचे बाकीचे साथीदार मात्र फरार झाले. पोलीस तपासात ही टोळी आंध्रप्रदेशची असून ते चोरी करण्यासाठी मुंबईत येत असल्याची माहिती समोर

आली. गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये बॅगचोरीच्या घटना वाढल्या होत्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version