संघर्ष समितीनं आगरी जनतेला फसविले

संघर्ष समितीनं आगरी जनतेला फसविले

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातून 27 गावे वगळण्याची मागणी करणारी संघर्ष समिती अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांच्या इशारावर चालते असा आरोप

आमदार गणपत गायकवाड यांनी केला.

 

त्याचप्रमाणे नेवाळी भागातील शेतकऱ्यांना दमदाटी करण्यात बेकायदा बांधकाम करणारे बिल्डर्स आणि भूमाफियाचं असल्याचा आरोपही गायकवाड़ यांनी केला.

 

कल्याण पूर्वेतील पार्वती हॉलमध्ये आयोजित केलेल्या दिलखुलास संवाद या कार्यक्रमात गायकवाड यांनी विविध प्रश्नांवर रोखठोक मते मांडली.

 

संघर्ष समितीला आगरी समाजाचे काही पडले नसून फक्त चमकोगिरी आणि राजकारण करण्याची हौस असल्याची टीका गायकवाड़ यांनी केली.

 

समितीने मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली मात्र एकही नगरसेवक आता संघर्ष समितीच्या मागे नाही ही वस्तुस्थिती असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version