पतंगाच्या मांजामुळे पक्ष्यांवर संक्रांत; तीन दिवसांत जखमी पक्षांच्या संख्येत वाढ

पतंगाच्या मांजामुळे पक्ष्यांवर संक्रांत; तीन दिवसांत जखमी पक्षांच्या संख्येत वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मकर संक्रांतीला पतंग उडविणे हा सण साजरा करण्याचा गुजरातमधला उत्सव आता मुंबईतही वाढला आहे. दरवर्षी या पतंगाच्या मांजामुळे हजारों शहरी आणि जंगली पक्ष्यांना मुकावं लागतं. खरं तर गेल्या 5 वर्षांमध्ये लोकांच्या जागरुकतेमुळे पक्षी जखमी होणे कमी झाले होते.

परंतु ,काही राजकीय आणि सांस्कृतिक मंडळीनी यंदा मोठ्या दिमाखात या सणाचे जाहिराती फलक लावून प्रोत्साहन केले ज्यामुळे गेल्या 3 दिवसात पक्षी जखमी होण्याचे प्रमाण अचानक वाढले. यावर पतंग उडविण्याच्या आनंदात आपल्याच जैव विविधतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीने सण साजरे करावे असे PAWS संस्थ तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version