स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य बारामतीचे राष्ट्रवादीचे बिनविरोध नगरसेवक किशोर मासाळ यांनी केलेल होत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये मासाळ यांनी रुपाली ताई मेली पाहिजे, अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही असं विधान केलं होतं. यामुळे बारामतीकर आणि अजित पवार प्रेमिंच्या भावना दुखावल्या होत्या. तसेच याबाबतीत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या नगरसेवकाचा राजीनामा घ्यावा यासाठी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली होती.
दरम्यान आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली असून मासाळ यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, “किशोर मासाळ यांनी केलेलं वक्तव्य फार घृणास्पद आहे. पक्षाने याबाबत दखल घेतली आहे.. दादांमुळे त्यांना राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.. त्यांना पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात येणार आहे..”
तसेच मासाळ यांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकीचे पश्चाताप करून म्हटले की, “स्वर्गीय अजितदादा यांचे कुटुंबीय समस्त बारामतीकर, आणि अजितदादावर प्रेमं करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनेतेची हात जोडून माफी मागतो… माझ्याकडून केले गेलेले वक्तव्य नक्कीच चुकीचे आहे. याबद्दल मला पश्चताप होत आहे. या विषयावरून सध्या बारामतीत नागरिकांच्या भावना तीव्र आहेत… परंतू माझ्या या वक्तव्याच्या आडून राजकारण होत आहे याचं मला दुःख वाटतंय.” किशोर मासाळ अजित पवार यांच्या जवळचे होते. अजित पवार यांच्या आवडत्या लोकांच्या यादीत ते होते. पण त्यांनीच अजिप पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतून मासाळ यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.