जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कमला मिल मधल्या मोजो बिस्ट्रो आणि वन-अबोव्ह या पबला लागलेल्या आगीनंतर. पोलिसांनी दोषींविरोधात कारवाई करायला सुरुवात केलीये.
या प्रकरणी मोजो बिस्टोचा मालक आणि माजी IPS अधिकारी के. के. पाठक यांचा मुलगा. युग पाठकला पोलिसांनी अटक केलीय. तर, दुसरा पार्टनर युग तुलीचा शोध अद्याप सुरुये.
या प्रकरणातल्या दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी भाजपाचे खासदास किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे कारवाईची मागणी केली.
यात फक्त मोजो बिस्ट्रो आणि वन अबोव्हच नव्हे तर थेट कमलामील प्रिमायेसचे मालक रमेश गोवनी यांनाही अटक करण्याची मागणी केलीये.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.