जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आयकर विभागाने बेनामी व्यवहार कायद्यांतर्गत कारवाई करत भुजबळ कुटुंबीयांची तब्बल 300 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती भाजप खासदार किरीट सोमय्यांनी ट्वीट करुन दिली.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना गेल्या वर्षी मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून भुजबळ आर्थररोड तुरुंगात आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.