वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या फिटनेसची काळजी कशी घेतात हे तसं सगळ्यांनाच माहिती. पण आता केंद्र सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये कोण जास्त फिट अशी स्पर्धा लागली.
इतकच नाही तर दोघांनी एकमेकांना चॅलेंज सुद्धा केलं. माजी ऑलंपिक खेळाडू आणि केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांचा एक व्हीडिओ केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी शेअर केला आहे.
आम्ही ड्युटीवर असल्यामुळे फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ नसतो पण राठोड हे त्यातनं व्यायामासाठी वेळ काढून मला चॅलेंज करतात असं ट्वीट केलं. आणि त्यानंतर स्वतः व्यायाम करतानाचा व्हीडिओ त्यांनी शेअर केला. याला उत्तर देताना व्यायामाच्या बाबतीत रिजीजू हे बरेच पुढे असल्याचं ट्वीट राज्यवर्धन यांनी केलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.