अमेरिकेला किम जोंग यांचा धमकीचा इशारा

अमेरिकेला किम जोंग यांचा धमकीचा इशारा

वृत्तसंस्था वॉशिंगटन

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्तर कोरियाचे किम जोंग उननं जगाला धमकी दिली आहे.नवीन वर्षाच्या मुहुर्तावर किम जोंग यांच धक्कादायक वक्तव्यसमोर आलयं की ‘आपण हातात नेहमी अणू बॉम्बचं बटण घेऊन फिरत असल्याचं’त्यांनी सांगीतल. तसेच ही धमकी नव्ही, तर सत्य असल्याचंही किम जोंग यांनी सांगितलं.

गेल्या काही महिन्यांपासून उत्तर कोरियाने जगभरात तणावाची परिस्थिती निर्माण केलीये. याच जोरावर 2017 च्या शेवटच्या काही महिन्यांत उत्तर कोरियाने जगाला धमकावण्याचे सत्र सुरु केलं होतं. आपला अण्वस्त्र कार्यक्रम यापुढेही तसाच सुरु राहिल, असा इशाराही त्याने दिला आहे.

सीएनएनने कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (केसीएनए) च्या रिपोर्टवरुन सांगितलं की, “उत्तर कोरियाच्या धोरणांत यापुढेही बदलाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे.” पुढे त्यांनी असं ही म्हटलंय की, “ उत्तर कोरियाच्या शक्तीला आणि त्यांच्या अस्तित्वाला कोणीही धक्का लावू शकत नाही. शिवाय अस्तित्वया कोणी नाकारु शकत नाही. एक जबाबदार देश म्हणून उत्तर कोरिया सर्व अडथळे पार करत, स्वातंत्र्य आणि न्यायाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.”

अमेरिकेला धमकी देत पुढे म्हटलंय की, “जोपर्यंत अमेरिका त्याच्या अण्वस्त्र शक्तीचा धाक दाखवत राहिल. तोपर्यंत उत्तर कोरिया स्व-संरक्षणासाठी आणि संभावित हल्ल्याच्या तयारीसाठी अण्वस्त्र विस्ताराचा कार्यक्रम तसाच सुरु ठेवेल.”

तसेच, जर अमेरिकेकडून युद्धाला सुरुवात केल्यास, त्याचं चोख प्रत्युत्तर उत्तर कोरिया देईल, असंही या रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version